सुश्री दीप्ती कुलकर्णी
☆ कवितेचा उत्सव ☆ सोनेरी सकाळ ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
सोनेरी सकाळ
ही धरित्री अशी
साज हिरवा ल्यायली
धुंद गंधित होऊनी
प्रतिक्षेतच हरवली
कोण हे आले पहा
रविकर हा येतसे
सुस्नात या धरित्रीला
कनकसाज चढवितसे
हा सुगंध, ही हवा
मोहिनी मज घालिते
गंधवेड्या माझ्या मना
प्रतिदिनी निमंत्रिते
रोजचेच रुपडे हे
नित्यनवे भासते
काळोख्या रात्रीतुनी
उषःप्रभा ही जन्मते.
© सुश्री दीप्ती कुलकर्णी
कोल्हापूर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈