महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 192
☆ अभंग – नभ प्राप्त व्हावे… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
तिमिर जाऊनी, प्रकाश फुलावा
मनात भरावा, मधुगंध.!!
*
कश्मळ संपावे, विमळ होवावे
क्षितिज खुलावे, जीवनाचे.!!
*
नको अंधश्रद्धा, नको मनस्ताप
नको महापाप, घडो कधी.!!
*
ओठी हास्य यावे, मनं मोहरावे
संकल्पित व्हावे, सत्कार्यासी.!!
*
कवी राज म्हणे, नभ प्राप्त व्हावे
ओढूनिया घ्यावे, अंगावरी.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈