सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “नदीचं माहेर…” ☆ सुश्री शीला पतकी 

माझी लेक ही लेक हो लई अवखळ बालपण

माझी लेकहो लेकहो ल्याली तारुण्य देखणं ।।

*

उड्या मारीते मारीते अन धावते वेगानं 

ओढ सागरी सागरी न पाहे हो माघारी ।।

*

घेतो सागर सागर ओढून कवेत कवेत

वाटे नाही फिरुन आता येईल पुन्हा माहेरात ।।

*

पन बाईची हो जात येते सय माहेराची

म्हणे माझ्या भाऊराया सूर्यदेवा तू रे ताप ।।

*

अन भेटीव भेटीव माझा डोंगररूपी बाप

झाली वाफ नदी पहा पंख वाऱ्याचे लागले ।।

*

आलं भरून आतून झाले ढग हो त्यातून

बाप लेकीला आडवे वारा मायेचा हो मिळं ।।

*

लेक बांध फोडूनया मन मोकळे आभाळ

 येई लेक माहेराला म्हनून येतो पावसाळा ।।

…बाई जातीला हो असे लई माहेराचा लळा !।

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments