श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बातमी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

हरवली आहेच संधी लाभ होण्यासारखी

बातमी कळली मनाला झोप उडण्यासारखी

*

सोसतो वनवास आहे भोगताना यातना

वेळ नाही ही सुखाने श्वास घेण्यासारखी

*

वास्तवाने मांडलेला खेळ आहे घातकी

हाक येते रोज कानी जीव जाण्यासारखी

*

काळजाला काळजाची ओढ नाही राहिली

राहिली नाही स्थिती ही गीत गाण्यासारखी

*

संपला आदर्श आहे स्वार्थ झाला आंधळा

माणसे झालीत आता क्रूर प्राण्यासारखी

*

भोगवादी जीव झाले चैन आहे चालली

शासनाची धोरणे ही आज वाण्यासारखी

*

चालला आहे तमाशा रोज येथे वेगळा

लावणी घोळून होते दाद देण्यासारखी

*

प्रेमबंधाची कहाणी रोज करते मागणी

नेमकी ठरते वसूली लाच खाण्यासारखी

*

चेतना संपून गेल्या देह धोंडा जाहला

भावना गोठून गेली गार पाण्यासारखी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments