श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

झोपडी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

देह झोपडी

अती प्रिय मज

जपतो तीज

आवश्यक साधनेस…

 

ध्यान जपाने

तिज सारवतो 

सदगुरुसी हृदयाच्या

सिंहासनी बसवितो…

 

सदाचाराचे तोरण

दारी मी बांधतो

सु-मनाने सदगुरुसी 

नित पुजितो, आळवितो…

 

नैवेद्याचे ताट

विवेकाचे जिन्नस 

नीर-क्षीरचे कालवण

सत्कर्माचा धूप खास…

 

गुरुकृपेचा कवडसा

पडता अंतरीच्या डोई

तम, भय मनातले जाई

स्वच्छ प्रकाशाने उजळे झोपडी…

 

झोपडीत माझ्या

चैतन्याचा निवास

प्रेमाचा ही वास

शाश्वत आनंद हमखास…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments