प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ सृष्टी दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
नभी असंख्य तारा चमकती
उजळू ज्ञान दीप पणती ।। ध्रु ।।
*
सरकीचे तेल बीजात
वर बोन्ड शुभ्र कापसात
दोन्ही अद्वैत एक नांदती
लावू ज्ञान दीप पणती ।। 1 ।।
*
कापसाची घालूया वात
तेल सरकीचे पणतीत
पणतीची माता हो माती
*
लावू ज्ञान दीप पणती ।। 2 ।।
अनेक तारका नभी असती
त्यांचा जन्म हीच धरती
उजळे तमात ज्ञान ज्योती
लावू दिवाळीची पणती ।। 3 ।।
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈