श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 समजुतीचा घोटाळा !🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

⭐

       ( ३ ) “  “ 

                कवी : प्रमोद वर्तक 

 समजुतीचा घोटाळा ! 

उभा होतो बाल्कनीत 

नजारा भोवतीचा पहात, 

दिसे समोरच्या घरातून 

हलणारा ललनेचा हात !

*

जरी दुसरीकडे पाहिले तरी 

तिचा हात नाही थांबला, 

मम हृदयात काळजाचा 

या वागण्याने ठोका चुकला !

*
द्यावा प्रतिसाद तिला,

का दुर्लक्षावे मज सुचेना, 

केला कानाडोळा तरी 

तीचा हात हलणे थांबेना !

*
पण सौ.चा बसता धपाटा 

मी मग भानावर आलो, 

अन् मी त्या गावचाच नाही 

असे तिला भासवू लागलो !

*
“मांडे आपले मनांतले 

भाजा आपल्याच मनांत,

पुरी न होई इच्छा जन्मात

लाज बाळगा थोडी जनांत !

*
साफ करी ललना काच

न की दावी तुम्हां हलवून हात,

चला आता मुकाट्यानं घरात

दावते तुम्हां माझी करामत !”

⭐

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments