श्रीशैल चौगुले
☆ कवितेचा उत्सव ☆ ज्ञानकाव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆
थोरांचा आदर नित्यची ठेवावा
प्रार्थना देवाला ज्ञानाशी पावावा.
प्रथम आईचे वंदावे चरण
गुरुजींचा मान शिक्षणी लावावा.
ग्रंथांना पुजावे पुराण भजावे
विचारांचा दिवा सत्य तेववावा.
चोरी-लोभ त्याग सद्गुण मार्ग
अध्ययनी प्रज्ञा चिंती मिळवावा.
निसर्ग नियम वृक्ष-वल्ली सोयरे
संत, देव -धर्म नाते जुळवावा.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈