श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 261 ?

☆ पुरावा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

त्याच्या समोर त्याचा जाळला पुरावा

खोटाच त्या ठिकाणी जोडला पुरावा

*

डोळ्यामधील धारा सत्य बोलल्या पण

न्यायास मान्य नाही वाटला पुरावा

*

साक्षी फितूर झाले स्वार्थ जागल्यावर

घेऊन चार पैसे बाटला पुरावा

*

हाती धरून त्याने भ्रष्ट यंत्रणेला

फाईल चाळली अन चोरला पुरावा

*

ह्या न्यायदेवतेने बांधलीय पट्टी

डोळ्यामधेच आहे गोठला पुरावा

*

न्यायालयातसुद्धा हे असे घडावे

पैशासमोर होता वाकला पुरावा

*

भोगून सर्व शिक्षा संपल्याबरोबर

निर्दोष तूच आहे बोलला पुरावा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments