सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ सगुण विठ्ठल– – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
सावळा विठ्ठल,आहे हो निर्गुण
भक्तांसाठी आला, होऊन सगुण ।।ध्रु।।
*
सावळे रूप ते, आहे मनोहर
भक्तांना पावला, घाली अलंकार
मंजुळ नादाचे, सोन्याचे पैंजण
भक्तांसाठी आला ,होऊन सगुण
*
कनकाचा कद, विठोबा सजला
शोभली गळ्यात,मौक्तिकांची माला
माणिक मोत्यात,दिसे भक्तगण
भक्तांसाठी आला,होऊन सगुण
*
भक्तांनी अर्पिले, नाना अलंकार
भक्तांना भावले,भक्तिचे प्रकार
पावतो भक्तांना,सद्गुणाची खाण
भक्तांसाठी आला, होऊन सगुण
*
सावळा विठ्ठल आहे हो निर्गुण
भक्तांसाठीआला, होऊन सगुण ।।ध्रु।।
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Very nice and apt poem. Keep doing work