श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नेम नाही पावसाचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

का शोधावे मी स्वप्नांना,

स्थित होती जी लोचनी.

आठवावे का पुन्हापुन्हा ,

आठवणी जपल्या मनी.

त्या फुलांचे काय झाले,

ओंजळीत जी मी घेतली.

लावला जीव, गुंतलो जिथे,

ती नातीही दुरावली.

कोसले मी कोसल्यांना,

समजावले समजाऊनी.

समजून घेतले स्वत:ला,

चंद्रबळ उसने घेउनी .

भरुन आले आकाश माझे,

कधीतरी तू समजून घे.

नेम नाही पावसाचा,

पाऊस माझा कोसळूदे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments