महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 193
☆ अभंग… जावे पुस्तकाच्या गावा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
पुस्तकांच्या गावी, प्रवास करावा
हट्ट हा धरावा, प्रत्येकाने.!!
*
वाचावी पुस्तके, जीवन फुलेल
घडी ही बसेल, जीवनाची.!!
*
काळ्या अक्षरांची, किमया निराळी
सर्वांच्या वेगळी, शब्द-प्रभा.!!
*
एक एक शब्द, तयातील गूढ
होतील अमूढ, वाचताची.!!
*
ज्ञान मुक्ताफळे, स्वनेत्री पहावी
पाठी प्रकाशावी, स्वप्रवृत्ती.!!
*
कवी राज म्हणे, विश्वाच्या अंगणी
घ्यावे निवडूनि, हवे तेचि.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈