सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “तू फक्त मोकळं व्हावस….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆☆
पेन हातात घेतला
वाटलं
झरझर सारं
उतरवून काढावं मनातलं….
पेन वहीवर टेकण्याआधीच
त्यांनी घाई केली
थेंब थेंब उतरत
वही… पार ओली केली..
मग पाहिलं मी त्या वहिकडे
म्हणलं शब्दांपेक्षाही
जास्त काही
बोलून हे अश्रू गेले
पण तुला कळली का ग यांची भाषा
तर वही म्हणाली….
शब्द किंवा अश्रू
तुझ्यासाठी असतील वेगवेगळे
मला तर वाटतं ते येतात तुझ्यातून माझ्याकडे फक्त तुला करण्या मोकळे…..
कधी तू शब्द निवडतेस
कधी अश्रू तुला निवडतात
ते येतात आणि तुला मोकळे करून जातात…
मी फक्त एक माध्यम आहे
तुझ्या बंद मनाची कवाडे उघडून
तुझं मन तू खुलं करण्याच
मग तुझं तूच ठरवत जा
कधी शब्दांनी आणि कधी अश्रूंनी माझ्यावर लिहायचं…
मला दोन्हीही प्रियच
तू फक्त मोकळं व्हावंसं वाटतं मला इतकचं…
शब्दकळी विजया हिरेमठ मोकळं व्हावंस…
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈