श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ज्ञान दान… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
या शब्दांची आरती
प्रथम प्रभाती किरणा
या अक्षरांच्या वाती
अंतरी सुखाची धारणा.
चिंता पावे संतुष्टी
उगम भाव विवेकांती
नमन लेखणीस
चैतन्य ज्ञानेय प्रप्रांती.
रंगछटा जीवन
नयन नभाचे उजळ
कलकल भुवन
कल्पना पाखरे प्रांजळ
सकळ ऋतूनित्य
सत्यासवे जैसा शब्द सूर्य
प्रबळ नारायण
उतरावे शारद सौंदर्य
परम अनुभव
फुलून दिशा-दिशा पान
नवप्रभा सूर्य
मनाशी स्वैर ज्ञान दान.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈