सौ. अमृता देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

🙏🏻 घडी छान बसते… 🙏🏻 सौ. अमृता देशपांडे  

दोन टोकं जुळवली की

घडी छान बसते….

*

दोन टोकं जुळवणं खरंच

अवघड का असते… ?

मधलं काही जरा बाजूला

केलं तर

घडी छान बसते.

*

मागची पिढी पुढच्या पिढीशी

जुळणं अवघड का असते.. ?

मधली जरा बाजूला झाली तर

घडी छान बसते.

*

मागचे दिवस आताचे दिवस

तफावत का दिसते… ?

मधले नको ते काही विसरले तर

घडी छान बसते.

*

कागदावर लिहून दोन्ही टोके

जुळवावीत

आत लिहिलेले लपून रहाते..

मनातली घडी छान बसते.

*

तुझंही नको माझंही नको

मधलं सारं पुसून

परत टोकं जुळवली तर…

घडी छानच बसते.

*

घडीघडीचे आयुष्य

घड्याघड्यांनी भरते…

एक एक टोक जुळवता

घडी छान बसते.

*

घडी छान घालता घालता

हळूच उलगडली… तर

मधली रिकामी जागा

नेहमीच भरलेली दिसते.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments