श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ यज्ञ ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

अवचित आठवली

गाथा हृदयी भिडली

द्वाड झाल्या आठवणी

रात ढळाया लागली

*

अंगावरचा धडपा

त्याचा पदर फाटका

झाकू पहातो संसार

माझा फाटका नेटका

*

कुणा मदतीचा हात

नाही मागायचा आता

शब्द सुखाचे गाठोडे

हीच सारी मालमत्ता

*

गेली मरून मनशा

तिचे दु:ख नाही मला

चार दिसाचे जगणे

त्याचा किती बोलबाला

*

नको आवर्तन पुन्हा

जन्म मरणाच्या दारी

आहे पदरी बांधली

आर्धी सुखाची भाकरी

*

नको निवारा आणखी

नको वैभव कसले

लेखणीला आले बळ

त्याने जगाला जिंकले

*

नाही पुजला दगड

तेच आहे समाधान

दिलदार मैत्र माझे

माझ्या जगण्याचे धन

*

राना वनात भेटते

मला माझेच संचीत

जळे चंदनाची चूड

भोवतीच्या वादळात

*

खोड चंदनी जळता

दरवळ मुलुखात

यज्ञ झाला जगण्यचा

हेच घडले आक्रीत

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments