श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ऐवज… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
थंडिचा हिवाळा
काळीज धडके
हेमंत जिव्हाळा.
*
हरिते पाखरे
कधीची सकाळ
आळस भिनून
दुपार धुकाळ.
*
मनात मिठीची
अनोखीच ओढ
ओहोळही वाहे
आठवणी गोड.
*
क्षितीज सांजेत
कडाकी बिलग
हुडहुड अंग
शेकोटी सजग.
*
मनाला उमज
भावना समज
भोवती आगीच्या
ऋतूचा ऐवज.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈