सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ निराळे कायदे…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(आनंदकंद)
☆
भागीरथीत जाती पापे कितीक धुतली
होते मलीन ती जर आहे प्रथाच इथली
*
रानात सिंह राजा प्राणीच भक्ष्य त्याचे
मांडून कायद्याला टाळी तुम्हीच पिटली
*
वाटे कुणास नारी अन्याय सोसणारी
केले असूर मर्दन तेव्हा सुखात निवली
*
विश्वास ठेवला पण त्यानेच घात केला
नात्यास शुद्ध म्हणतो जाणून लाज विकली
*
मिळतो बरा तुम्हाला बाहेर न्याय सहजी
न्यायालयात माझी नाणी बरीच झिजली
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈