श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 265
☆ वय झाडाचे लावणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वय झाडाचं झालं सोळा
पक्षी भवती झालेत गोळा
डोम कावळाही बघतोय काळा
हिरवंगार झाड आलंय भरून
आणि इथं, मालक मरतोय झुरून
*
कुणीही मारतंय खडा झाडाला
मजबुती आली या खोडाला
कैऱ्याही आल्या व्हत्या पाडाला
झाकू कसं, झाड हे सांगा वरून
*
पानाखालती पिवळा आंबा
केसरी होऊद्या थोडं थांबा
पहात होता दुरून सांबा
मोहळ हे, छानक्षच दिसतंय दुरून
*
काल अचानक वादळ आलं
झाड भयाणं वाकून गेलं
आणि लुटारू मालामाल झालं
किती, किती, ध्यान ठेवावं घरून
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈