श्री उद्धव भयवाळ
☆ कवितेचा उत्सव ☆ हिशोब नाही ठेवला ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
कोणी कधी छळले किती, हिशोब नाही ठेवला
मन माझे जळले किती, हिशोब नाही ठेवला
या इथे अन् त्या तिथे, नेम त्यांनी साधला
बाण उरी घुसले किती, हिशोब नाही ठेवला
जखमा जरी ओल्या उरी, हास्य नाही लोपले
तोंडामध्ये साखर अन् बर्फ शिरी ठेवला
विद्ध विद्ध झालो जरी, अंतरी रडलो जरी
आसवाचा थेंबही, नाही कुणा दावला
आता तर त्यांना मी, माफही केले पुरे
द्वेषाचा लेशही, नाही मनी ठेवला
© श्री उद्धव भयवाळ
संपर्क – १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९
मोबाईल – ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९
ईमेल – [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈