सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “पार सावलीचा” ☆ सौ राधिका भांडारकर 

(पुरस्कार  प्राप्त  कविता -> विषय: माझे बाबा – काव्यप्रकार: दिंडी वृत्त)

तीर्थ ते उरले गेली ती गंगा

बाबा पाळती ही विचारगंगा॥

 *

भाव  त्यात  असे  हो स्थिर चित्ताचा

त्याग लोभाचा आणि संचयाचा ॥

 *

अभ्यास गाढा व्यासंग दांडगा

समाधान हाच सुखाचा तोडगा ॥

मते कुणावरी कधी ना लादली

संस्कार कामी स्वये ती पाळली ॥

 *

वेचले कण ते आम्ही ज्ञानाचे

सहज जगताना कसे अमृताचे ॥

 *

 मुक्त शांत सदा निसर्गात रमले

अज्ञात एका शक्तीस मानले॥

 *

 स्वयं बुद्धीने सत्यास जाणले

शाश्वत सर्व ते आम्हा बिंबविले ॥

 *

 ती दृष्टी दिली सुंदर जगण्याची

 ओंजळीत दिली शिकवण प्रेमाची॥

 *

 पहाडासमान कणखर ते होते

संकटात किती ताठ उभे होते॥

 *

 साहित्यिक कला संगीतात रुची

आस बाळगली ध्यान धारणेची ॥

 *

ध्यास विद्येचा विद्यार्थी घडले

जगण्या जाणते  संस्कारी केले ॥

 *

चतुरस्त्र होते व्यक्तिमत्व त्यांचे

अभिमान वाटे असे कार्य त्यांचे॥

 *

पंचकन्यांचे परमपूज्य बाबा सुखदुःखातल्या पथी जणू थांबा॥

 *

कसा खात्रीचा  खांदा मायेचा

वटवृक्ष होता पार सावलीचा ॥

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments