श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🎽 अनोखा स्वेटर ! 🎽 श्री प्रमो वामन वर्तक
☆
गुंडा लोकरीचा आठवांचा
सहज हाती लागला,
उब न्यारी जाणवता
स्वेटर विणाया घेतला !
*
झाडून साऱ्या नात्यांची
मी छान वीण गुंफली,
होता तयार सुंदर नक्षी
मती माझी गुंग जाहली !
*
तयार होता होता स्वेटर
शिशिर पूर्ण संपून गेला,
नाही कळले कधी मला
वैशाख वणवा लागला !
पण,
मनी ठेवला जपून स्वेटर
केली उतारवयाची सोय,
गोष्ट सांगतो गमतीची
भावी शिशिरांचे सरे भय !
भावी शिशिरांचे सरे भय !
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈