श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “नव्या युगाचे गीत…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
नव्या युगाचे आता गीत गायचे आहे
नवचैतन्याचे आता तेज प्यायचे आहे.
*
स्वागतास नव वर्षाच्या निशा निमंत्रण तुम्हा
तेज प्राशण्या तुम्हा उषा निमंत्रण आहे.
*
हे धुंदी मधले नृत्य स्वार तमावर व्हावे
ही तेज शलाका पकडा हा मंत्र युगाचा आहे.
*
तेजाची धुंदी जेंव्हा रोम रोम फुलवील
तो सूर्य झेलण्यासाठी सज्ज व्हायचे आहे.
*
लाजून ईश्वरा पुढती पाण्याचे मद्य जहाले
तो प्रेषित चैतन्याचा तुम्हा व्हायचे आहे.
☆
© श्री सुनील देशपांडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈