श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ नूतनवर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
दैनंदिनी
असे आत्मा
वर्षरुपी वसन
बदलून लागू कामा…
करु संकल्प
राहो साधनेतील सातत्य
नकोत विकल्पाचे
अधिपत्य…
एकचि सदगुरु
नकोत चोविस गुरु
आत्मोन्नतीचा ध्यास धरू
उन्मन हमखास..
तिळा तिळाने
जसा दिन होई मोठा
तसा चढू सोपान
श्रद्धेने धिराने…
सोप्प नाहीए
तरी मनात आहे विश्वास
या जन्मी सुरवात जरी
निश्चित होवू विलीन परमात्म्यासी…
आंग्ल नूतनवर्षाच्या अनंत शुभेच्छा.
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈