सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ नववर्ष– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
येणार ते जाणार हे कळायलाच हवं
गेल्यावरच तर येणार ना दुसरं काही नवं?
*
नवं नवं नवलाईचं गुणगान गावं
गाता गाता नवलाईने भारावून जावं
नव्यामध्ये जुन्याच्या आठवणीत रमावं
जुनं ते सोनं हे तेव्हा समजावं
*
म्हणूनच जुन्याचे बोट सोडायचं नाही
नव्याचे बोट पकडले तरी त्यात वाहून जायचं नाही
जुन्याच्या कडीत नव्याची कडी सांधायची
अशी साखळी गाठवून नव्याची कास धरायची
*
नव्या वर्षाचा प्रत्येक क्षण खास व्हावा
आपला देह हर्षोल्हासाचा आस व्हावा
नव्यावर्षात नवं आव्हानांचा करण्या सामना
आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभ कामना ||
*
Happy new year 2025
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈