श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ 🙋२०२४ — 🤗२०२५ ☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
तीव्र उन्हाळे, ऊन कोवळे,
पूर राक्षसी, थेंब आगळे,
कंपित थंडी, सुखद गारवा,
दु:खापाठुन, सुख शिडकावा..
*
सुख-दु:खांचे अनुभव देउन
वर्ष कालचे गेले वितळुन
नव वर्षाचे करु या स्वागत
नवी नवेली स्वप्ने घेऊन..
*
सौख्य सुखे द्यावी नववर्षा
रुचीपालटा थोडी दु:खे
असेच यावे हासत नाचत
रंग घेउनी इंद्रधनूचे
🌺
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈