श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ स्वप्नवेल ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
शुक्राचे चांदणे पडले पहा क्षितिजावर
रातराणी उमलूदे तुझ्या मुखमंडलावर
स्वप्नरंगी चांदण्यांना घेऊनिया संगती
एकमेकांच्या सवे ग धुंदल्या त्या सर्व राती
सांग,सांग काय झाले आज तुजला प्रिये
व्यर्थ जाते चांदणे तू अशी जवळीच ये
सोडूनिया राग लटका हास पाहू एकदा
वा नववधूसारखी तू लाज पाहू एकदा
प्रार्थितो मी आज तुजला ऐक ग माझे जरा
चांदणे आहे तोवरी स्वप्न रंगवूया जरा
वा,सखी वा, मानिली तू प्रार्थना माझी खरी
रातराणी बहरली आपुल्या स्वप्नवेलीवरी.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈