सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ सण संक्रांतीचा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
☆
सण संक्रांतीचा येता,
सुगीचा हा काळ आला!
निसर्गाच्या लयलुटीचा,
बहर सर्वत्र पसरला !… १
*
निरभ्र आकाशात जमला,
रंगीत पतंगांचा मेळा!
आनंद त्याचा लुटण्याला,
सान – थोर झाले गोळा!… २
*
तिळगुळ आणि हलव्याचा,
सुगंध मनी दरवळला!
थंडीत शेकोटीचा आनंद,
जमले सगळे लुटण्याला!… ३
*
जात, धर्म, पंथ सगळे,
विसरून जाती आनंदात!
एकमेकाप्रती सौहार्दाचा,
तिळगुळ देऊन सौख्य लुटत!… ४
*
होता सूर्याचे संक्रमण,
दिवस होई मोठा मोठा!
ऋतुचक्राच्या संगतीत,
लुटु या आनंदाचा साठा!… ५
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈