कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 240 – विजय साहित्य ?

☆ सौभाग्य कंकण..! ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

सौभाग्य कंकण,

संस्कारी बंधन.

हळव्या मनाचे,

सुरेल स्पंदन…! १

*

सौभाग्य भूषण,

पहिले‌ कंगण.

माहेरी सोडले,

वधुने अंगण…!२

*

सौभाग्य वायन ,

हातीचे कंकण.

मनाचे मनात,

संस्कारी रींगण..!३

*

सप्तरंगी चुडा,

हिरव्या मनात .

हिरवी बांगडी,

हिरव्या तनात…!४

*

प्रेमाचे प्रतीक,

लाल नी नारंगी .

जपावा संसार   ,

नानाविध अंगी..!५

*

निळाई ज्ञानाची,

पिवळा आनंदी.

सांगतो हिरवा,

रहावे स्वच्छंदी…!६

*

यशाचा केशरी ,

पांढरा पावन .

जांभळ्या रंगात,

आषाढ श्रावण..!७

*

वज्रचुडा हाती ,

स्वप्नांचे कोंदण.

माया ममतेचे,

जाहले गोंदण…!८

*

आयुष्य पतीचे ,

वाढवी कंगण.

जपते बांगडी,

नात्यांचे बंधन…!    ९

*

चांदीचे ऐश्वर्य,

सोन्याची समृद्धी.

मोत्यांची बांगडी ,

करी सौख्य वृद्धी..!१०

*

भरल्या करात,

वाजू दे कंकण ,

काचेची बांगडी,

संसारी पैंजण…!११

*

चुडा हा वधूचा,

हाती आलंकृत .

सासर माहेर ,

झाली सालंकृत..!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

कविता पण छान अलंकृत झाली.