सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ लोकशाहीचे स्तंभ…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(वनहारिणी – ८/८/८/८)
☆
लोकशाहिला आधाराला
आहेत म्हणे चार स्तंभ हे
गोंधळ माजू नये म्हणोनी
असतात विधीकार स्तंभ हे
*
पळवाटांचा शोध लावती
त्यांना मोठा वचक बसावा
म्हणून येथे पोलीस रूपे
असती कार्यभार स्तंभ हे
*
ढासळू नये संसद अपुली
तोल उचलुनी सांभाळावा
यासाठी तर सुसज्ज असती
न्यायपालिका द्वार स्तंभ हे
*
पाय लंगडे तीन पाहता
चौथा आला आधाराला
सांभाळाया माध्यम म्हणजे
लेखणीचे प्रहार स्तंभ हे
*
कसले फसती पाय सदा हे
सत्तेला या सावरताना
बरेच पक्के हवे जनांचे
ऐक्याचे आधार स्तंभ हे
*
ताज घालण्या जनसत्तेला
सोनार कुशल तशीच जनता
निर्माणाला कारण बनले
सुवर्ण मंदिरकार स्तंभ हे
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान
धन्यवाद वसंता