श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
सायं छटा !
श्री प्रमो वामन वर्तक
☆
घडे सप्तरंगांचे आकाशी
सांडती बघा मावळतीला,
आटपून आपली दिनचर्या
रवीराज चालले अस्ताला !
*
निरोप घेता घेता अवनीचा
मुख अवलोकी सागरात,
शांतजल चंदेरी चमचमते
बनून आरसा देतसे साथ !
*
रंग केशरी मावळतीचा
शोभा वाढवी किनाऱ्याची,
पिवळ्या बनी केतकीच्या
होई सळसळ वाऱ्याची !
*
परतू लागती घरट्यातूनी
पक्षी पिलांच्या आठवाने,
वाट परतीची चाले गोधन
आता पाडसांच्या ओढीने !
*
पावता अंतर्धान नारायण
साम्राज्य पसरेल रजनीचे,
सुरु होईल राज्य रानोमाळी
बागडणाऱ्या निशाचरांचे !
बागडणाऱ्या निशाचरांचे !
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈