सौ. राही पंढरीनाथ लिमये
☆ कवितेचा उत्सव ☆ भास तुझ्या स्वप्नांचा ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆
गंध दरवळला बकुळी चा
इशारा तुझ्या येण्याचा
बावरे मन चाचपे कुंतलाना
परी भास हा माझ्या मनाचा.
पोर्णिमेचा चंद्र मना मोहवी
स्वप्न तुझ्या प्रिती चे जागवी
स्वप्न भंगता डोळे ओले
तुझ्या आठवांचा झुला झुलवी.
मन वेडे समजाऊनी समजेना
जखमा उरी स्वप्नात गुंतताना
आता भेट आपली पुढील जन्मी
तरी मन मोहरे स्वप्नी भेटताना.
राही पंढरीनाथ लिमये.
सौ. राही पंढरीनाथ लिमये
मो नं 9860499623
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सत्यात नाही आलो स्वप्नात येऊ का
तमात हळुवार येऊनि स्वप्नसखा होऊ का
रंगुनी स्वप्नामध्ये स्वप्न होईल सत्य
आणि प्रभाती नेत्र उघडता सत्य भासे च असत्य