श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 272
☆ आली जीवनी सरिता… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आली जीवनी सरिता, स्वच्छ वाटते मनास
थांब सांगतो मी आता, तीव्र उन्हास उन्हास
*
दरवळ हा कशाचा, मला वाटे ओळखीचा
स्पर्श वाऱ्याच्या सारखा, आहे माझ्याच सखीचा
तिच्या श्वसात भरला, आहे सुवास सुवास
*
नाही बिघडले काही, सूर्य उगवला नाही
शुभ्र कातीचा उजेड, मला वाटतो प्रवाही
माझ्या भोवताली आहे, तिचा प्रकाश प्रकाश
*
आले अंगणी चांदणे, त्याच्या सोबत चालणे
फडफड ही डोळ्यांची, तिचे मिठास बोलणे
नाही राहत मी आता, कधी उदास उदास
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈