☆ कवितेचा उत्सव ☆ किती झालो आम्ही आता कणा हीन ☆ श्री लक्ष्मण उपाध्ये ☆
किती झालो आम्ही आता कणा हीन !
माय मराठी भाषा झाली दीन !
नाही बोलू शकत आम्ही आता शुद्ध मराठी !
नसे परि आम्हां त्याची मुळी क्षीति !
व्याकरणाची सदा हत्या करतो !
ऱ्हस्व, दीर्घ उच्चार विसरून जातो !
“पूर्व“, “क्रीडा“, “आशीर्वाद“ असले शब्दही अशुद्ध लिहितो !
“पाणी“ नी “पाणि“ मधला फरक न जाणतो !
“माझी मदत कर “, असे बिनदिक्कत बोलतो !
“गृह “ आणि “ ग्रह “ दोन्ही एकच मानतो !
नाही धड इंग्रजी भाषा लिहितो !
ना अस्सखलित इंग्रजीही बोलू शकतो !
नाही मराठी, नाही इंग्रजी !
ना खंत, ना खेद, ना लाज याचीही !
आज सत्तर वर्षे लोटूनही
मराठी भाषेची अवस्था शोचनीय ही !
© श्री लक्ष्मण उपाध्ये
१९.०२.२०२१
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈