☆
जुने सारे बदलत चालले
नव्या संस्कृती चे वारे आले
*
रहाणीमान अन सवयी साऱ्या
नव्या रुपाने बदलत गेल्या
*
रेडिओवरच्या रुपक, श्रुतिका
टिव्हीवरच्या मालिका झाल्या
*
सायकल जाऊन दुचाकी आली
फोनसुध्दा मग स्मार्ट झाले
*
कपड्यांच्या तर कितीक फँशन
रोज नव्याने बाजारात आल्या
*
शिक्षणातही बदल तितकाच
नविन अभ्यासक्रमात झाला
*
पोळी, भाकरी मागे पडली
पिझ्झा बर्गरची आवड झाली
*
जुन्या संस्कृतीची कास आगळी
नव्याची मात्र धाटणीच न्यारी
*
काही बदल जरी स्तुत्य वाटले
तरी जुनेही काही वाईट नव्हते
*
जुन्यातील काही अवघड वळणे
नव्यामुळे थोडे सोपे झाले
*
कितीही जपली जुनी संस्कृती
तरी नविनचे करु स्वागत दारी
☆
© सुश्री त्रिशला शहा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈