सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ शेवटचा निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
एकत्र शिकलो एकत्र वाढलो
सुख दुःखात एकत्र सामील झालो
नोकरीच्या निमित्ताने गेलो निघून
मित्रा शेवटचा निरोप द्यायला
येशील ना रे धावून
घराट्या तील पाखरं उडून गेली
आनंदी वस्तू आता सुनी सुनी झाली
थकलो रे फार एकटा धीर धरून
मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील
ना रे धावून
वय होतं चाललं अशा नाही उरली
आयुष्याची गणितं जुळवता वेळ सरली
डोळे झाले लाल वाट तुझी पाहून
मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील
ना रे धावून
या बाल मनाला साथ हवी तुमची
बोलता बोलता सत्तरी आली आमची
ध्यास धरला मित्रांचा वेड्या मनानं
मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील
ना रे धावून
मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील
ना रे धावून
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈