प्रा. सुनंदा पाटील
कवितेचा उत्सव
☆ श्वास उरले मोजके प्राणात माझ्या… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
☆
लाजली थोडी गझल श्वासात माझ्या
शब्दही पडलेत ना प्रेमात माझ्या
*
ओळखू येतील माझे मित्र सारे
वेदने तू येत जा घरट्यात माझ्या
*
मी न लिहिल्या पुस्तकांच्या भव्य राशी
दोन ओळी जीवना बोटात माझ्या
*
पांढऱ्या भाळावरी नव्हतीच लाली
रंग हिरवा आडवा रस्त्यात माझ्या
*
प्रीत मी मागू कुणाला सांजवेळी
श्वास उरले मोजके प्राणात माझ्या
☆
गझलनंदा
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप सुंदर गझल!