श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ होळिची बोंब… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नाही गहु हरभर्या कोंब

दोन्ही हाताने होळीत बोंब

वि. का. स. सोसायटीची झोंब

कर्जमाफी नाही मारा बोंब.

 *

पैका न्हाय, अडकाबी न्हाय

काँक्रिट खाया शिकलो असतो

रस्त्ता कान्ट्रक्ट मिळाले असते

आश्वासनं खोटीच मारा बोंब.

 *

ह्यांव करतो त्यांवबी करतो

निवडून आल्यावं झाल काम

मोठी माणसं लाचत जाम

शेतकरी मेला मारा बोंब.

 *

एक-दोन न्हाय तीघं मंत्री

कळली न्हाय नेमकी जंत्री

भानगड एकच कळंत्री

जनता येडीच मारा बोंब.

 *

चंगळ चैनीत सत्ता हाय

पाच वर्षे आता गुड् बाय

महामार्ग जोडा हाय फाय

तोंडावर हात मारा बोंब.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments