महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 203
☆ कर्माचे गणित… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
जसे करशील कर्म, तसलेच फळ मिळेल,
चांगुलपणाच्या वाटेवर, पुण्यसंचय फळेल.
*
पेरलेस प्रेम जिथे, तिथे प्रेमच उगवेल,
सत्याच्या या मार्गाने, आनंद नांदू लागेल.
*
दुष्ट कर्माची सावली, दूरवर पसरते,
कालांतराने तीच नियती, न्यायाने उत्तर देते.
*
पाणी घालशील तरच, फळे-फुले फुलतील,
धूळ झटकता मनाची, नवे मार्ग गवसतील.
*
कसेही जरी वागलास, नियती पहात असते,
केलेले कर्म अखेरीस, तुझ्यापुढे उभे असते.
*
म्हणोनी, कविराज, तू फक्त सत्कर्म कर,
फळ नक्कीच मिळेल, थोरांचा योग्य आदर कर!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈