सुश्री प्राची जोशी

अल्प परिचय

मूळ गाव… कोल्हापूर, सध्या पुणे

  • रसायनशास्त्र विज्ञान पदवीधर
  • होमिओपॅथि अभ्यासक्रम केवळ आवड म्हणून पूर्ण केला.
  • हॅन्ड एम्बाॅयडरी म्हणजे भरतकाम या कलेचा छंद व नंतर त्याचे व्यवसायात प्राविण्य. ‘प्राचीज क्रिएशन’ या नावाने व्यवसाय प्रसिद्ध. ‘असावा ड्रेस माझा वेगळा’ हे व्यावसायिक ब्रीदवाक्य.
  • बालपणापासून कलाकुसर व खाद्यपदार्थ बनविण्याची आवड.

? कवितेचा उत्सव ?

☆ थोडेसे स्वतःसाठीही जगणे… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

थोडेसे स्वतःसाठीही जगणे – 

जगावं तर फुलासारखं…

*

फुलांनी भरलेली ओंजळ माझी,

तुझ्या हाती रिती केली… तरीही…

रिकामी ओंजळ माझी तशीच

छान सुगंधाने दरवळलेली

*

सुकली फुलेही स्वधर्म जपणारी

स्वतःचा सुगंध कायम ठेवणारी

सुगंधी आनंद भरभरून वाटणारी

अन् सुगंधातच मनस्वी रमणारी

*

फुलांचा स्थायीभाव आनंदी

अलवार तोडल्यावरही हसणारी

कोणी कशालाही वापरली तरी

चुरगळल्यावरही सुगंध लुटणारी

*

माणसांप्रमाणे प्राक्तन फुलांचेही

कोणी विराजे देवाचरणी

कोणी फेडे कर्म मागचे अन्

कोणाचा विसावा मृतदेहावरी

*

फुले सर्वच मन मोहवणारी

देवाच्या न्यायाला मानणारी

जिथे वास करती तिथेच

संपूर्ण समर्पण करणारी

*

समर्पणातही आनंद मानून

खंबीर आयुष्य पेलवणारी

सुगंध दुसऱ्यावर लुटूनही

वाऱ्यावर मनस्वी डोलणारी

*

फुलांकडे पाहून वाटे असे,

शिकावे यांचे मोहक वागणे

देवाचरणी विलीन होऊनही,

थोडेसे स्वतःसाठीही जगणे

…थोडेसे स्वतःसाठीही जगणे…

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो ९८२२०६५६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments