श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ संपवा हा खेळ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
तुझ्या टिळ्यासाठी,
देहाची सहाण.
फाटली वहाण,
पायातली.
पायाखाली माझ्या,
तुझीच रे वाट.
व्यर्थ पायपीट,
आयुष्याची.
आयुष्याची दोरी,
तुझ्या हातातली.
झालो कळसूत्री,
निव्वळ पुतळी.
विठु माउलीये,
नको लावू वेळ.
संपवा हा खेळ,
आवडीचा.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈