☆ || आई कळली सगळी || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
☆
चूल मांडली वेगळी, मजा वाटली आगळी
दिसा माग दिस गेले, आई कळली सगळी
*
खूणा सांगती भाजल्या, खस्ता केवढ्या खालल्या
तिने मारता फुंकर, थंड कातडी सोलल्या
*
किती कमवावे तरी, काही हिशेब लागेना
धुंडाळले डबे सारे, भूक त्यानेही भागेना
*
कशी जपू नातीगोती, अडसर कुंपणाचा
तिच्या पदराचा झेंडा, साज होतो अंगणाचा
*
जेव्हा थोडे आईपण, आले माझ्या खांद्यावर
झाला चेहरा मळका, थांबल्याने बांद्यावर
☆
कवी : म. ना. देशपांडे
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈