सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ गझल☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(आम्ही सिध्द लेखिका संस्था, राज्यस्तरीय गझल लेखन स्पर्धा २०२५. वर्ष तिसरे उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त कविता )

(मात्रा वृत्त — अनलज्वाला – ८|८|८)

किती अपेक्षा जगाकडुन या करतो आपण

थट्टेचा मग विषय जगाचा बनतो आपण

*

खरे नि खोटे पुरते माहित नसते तरिही

अर्ध्या हळकुंडाने पिवळे दिसतो आपण

*

झाड वाढते सहा ऋतूंची लहर सोसुनी

फक्त उत्सवी वसंत वैभव पुजतो आपण

*

बोलण्यातला अर्थ चुकीचा का लावावा

अर्थपूर्ण ती विरामचिन्हे पुसतो आपण

*

सुखदुःखाचा मेळ गुंफिते नियती अविरत

फक्त सुखाच्या पाठीमागे पळतो आपण

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments