श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🙏 जि व ल ग ! 🙏 श्री प्रमो वामन वर्तक
☆
आता थांबवीन म्हणतो
जरा शब्दांशी ते खेळणे,
त्यांनी तरी किती नाचावे
सदा माझ्या मनाप्रमाणे !
*
कशी कोण जाणे याची,
लागे शब्दांना कुणकुण,
सोडले अचानक त्यांनी
माझ्या डोक्यातील ठाणं !
*
गेले असेच दोन दिवस
सरल्या रात्री दोन-तीन,
‘ते’ परतणे शक्य नाही
याचे मज आले भान !
*
आज अवचित पडता
थाप डोक्याच्या दारावर,
उघडून पाहता दिसले
माझेच मला जुने मैतर !
*
गळा भेट होता आमची
सारे मनोमनी सुखावलो,
नाही सोडणार साथ कधी
एकमेका वचन देते झालो !
एकमेका वचन देते झालो !
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈