सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ स्वागत… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
आम्ही आहोत सगळे हिंदू
जोडू बघतो विश्वातले बंधू
द्वेष अाम्ही शिकलो नाही
वाटून घेतो असलेले काही
*
मुळात आम्ही उत्सवप्रिय
सगळ्याच सणांमधे सक्रीय
आम्ही आहोत परंपराप्रिय
मनानी नेहेमीच राहू भारतीय
*
लावून गुढ्या तोरणे दारात
गुढी पाडव्याच्या नववर्षात
आनंदाचा सोहळा उत्सवात
आप्तजनांच्या भेटीची बरसात
*
करूया स्वागत सौर वर्षाचेही
अवघे विश्व एक होऊ पाही
त्याग करूनी आंग्ल प्रथेचा
उत्सव मात्र हिंदू परंपरांचा
*
दारी रांगोळी गोड खाऊनी
उजळू दीप घरा घरामधूनी
सोमरसाला फाटा देऊनी
साजरा करूया आनंदानी
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈