श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 279 ?

☆ कैलास व्हावे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वाटते मुद्दाम मी नापास व्हावे

मालकी मजला नको मी दास व्हावे

*

पाउले गिरिजा पतीची पूज्य मजला

त्याचसाठी वाटते कैलास व्हावे

*

रेशमी केसात गजरे माळले तू

वाटते आहे सुगंधी वास व्हावे

*

चाळलेला देह सारा हा तुझा मी

वाटते आता तुझा मी श्वास व्हावे

*

दूर तू आहेस याची जाण आहे

तू जवळ आहेस असले भास व्हावे

*

आसनावर तू बसावे छान पैकी

आसनाची मी तुझ्या आरास व्हावे

*

पाहिलेला हिंस्र प्राणी मी भुकेला

वाटते मज आज त्याचा घास व्हावे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments