सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ अनुभूती… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
जीवनात विषय, प्रसंग खूप असतात
निवडक मात्र मनाला स्पर्शतात
न स्पर्शलेले काही गौण नाही
त्यावर व्यक्त व्हायला मनाची तयारी होत नाही.
*
खूप काळ लोटूनसुदधा त्यातली एखादी
गोष्ट वा प्रसंग मनात रुंजीधरून राहतात.
तिच्या किंवा त्यांच्या नकळत मग त्यांच्या
सुंदर अशा काव्यपंक्ती घडतात.
*
बनलेल्या काव्यपंक्ती कवीच्या
अनुभवाची सत्यता असतात.
म्हणूनच वाचणार्याला त्या एक
निखळ आनंद देऊन जातात.
*
स्वानुभवाने डवरलेली कविता
कवीसाठी सत्यानुभव असतो,
तिला वाचणार्यासाठी ती मात्र
निर्मळ, शुदध असा उपहार ठरतो
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈