सुश्री नीता कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ “तुळस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
☆
तुळशीचं बीजं लावलं मातीत
उगवून आली ती माझ्या अंगणात…
*
माझी हिरवी तुळस भराभरा वाढली
गळ्यात विठूच्या शोभाया लागली…
*
नैवेद्याचं ताट वाढून तयार केलं
तुळशीचं पान अलगद भातावर ठेवलं….
*
तुळस पाहिली की कृष्ण सखा आठवतो
एका पानाचं मोलं सांगून जातो…
*
तुळशीची माळ वारकरी घालतो
अभिमान संस्कृतीचा मनी जाणतो
*
झालं झाड मोठं आल्या तुळस मंजिरी…
हळुचं बीजं काढा पुढच्या झाडाची तयारी…
*
वाळलेल्या काड्या नीट जपून ठेवू
त्याचीच काडवात देवा पुढे लावू….
*
अशी ही तुळस घरोघरी असू दे ग बाई
जपा वारसा संस्कृतीचा ती शिकवून जाई….
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈