डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

🍃 उंबरा 🍃 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पाहिले मी जेव्हा त्याला

पापण्या नकळत झुकल्या

ढगाआड लपला सूर्य

पाकळ्या अलगद मिटल्या

*

व्याकूळ नजरेने मी

शोधत होते शब्द

बोलणे सुचले तरी,

विचार मनात स्तब्ध

*

तो मुक्त विवेकी होता

मज दडपण गहिरे होते

तो स्वच्छंद माणूस मोठा

मी उंबरा सोडत नव्हते.

*

ओठावर शब्द फुटेना

नजरा बोलत होत्या

अमाप साठून देखील

अबोल संवाद होता..

*

मानवी मनाला कसे

कोड्यात कुणी टाकले

निर्धोक भाव मनीचा

काळाने विपरीत लुटले

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments