कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 246 – विजय साहित्य ?

☆ आरसा…!

माया ममता जिव्हाळा,

एकमेका लावी लळा.

वाटे सहवास ओढ.

आठवांनी दाटे गळा…! १

*

स्नेह,सौहार्द ओलावा,

आपुलकी अनुबंध.

नाते जपता कळती,

जिव्हाळ्याचे रंगढंग ..! २

*

रक्ताहून बळकट,

नाते जिव्हाळ्याचे थोर.

प्रेम मैत्री विश्वासात,

हवा जिव्हाळ्याचा दोर..! ३

*

सम विचारांची मोट,

आहे जिव्हाळ्याचा मळा.

माणसात शोधी देव,

उरी ज्याच्या कळवळा…! ४

*

पैसा फक्त व्यवहार,

करीतसे देणे घेणे.

हृदी जपतो जिव्हाळा,

भाव भावनांचे लेणे….!५

*

नसे जिव्हाळा आसक्ती,

नसे मागणे लालसा.

माणसाच्या मानव्याचा,

असे जिव्हाळा आरसा…!६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments